गडकिल्ले

पुण्यातील किल्ले | Forts in Pune | पुण्याजवळील सर्वोत्कृष्ट १० किल्ले

भारताच्या पश्चिम किनारपट्टीला समांतर लाभलेली भली मोठी डोंगरांची रांग म्हणजेच सह्याद्री यालाच पश्चिम घाट असेही म्हटले जाते. ही रांग तापी नदीच्या दक्षिणेकडून सुरू होते आणि महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तमिळनाडू आणि केरळ या राज्यांमधून भारताच्या दक्षिण टोकापर्यंत जाते.

सह्याद्री हे पुण्याला लाभलेले सर्वात सुंदर वरदान आहे. आकाशासोबत स्पर्धा करणारे सह्याद्रीचे कडे, नागमोडी घाट रस्ते, खळखळणाऱ्या नद्या, नयनरम्य कोसळणारे धबधबे, झाडांची दाटी आणि हिरवीगार पठारे एखाद्या निसर्ग चित्राप्रमाणे सुंदर दिसतात.

पुण्यातील किल्ले हे महाराष्ट्राच्या इतिहासाचे आणि संस्कृतीचे प्रतीक आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मावळ्यांनी या किल्ल्यांची निर्मिती केली आणि मासाहेब जिजाऊ यांच्या स्वप्नातील स्वराज्याची स्थापना केली. या किल्ल्यांनी स्वराज्याच्या लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

जर तुम्ही पुण्यात असाल किंवा पुण्यात येण्याचा विचार करत असाल, तर नक्कीच तुम्ही या प्रेरणादायी आणि उर्जेने भरलेल्या किल्ल्यांना भेट द्यायला हवी. पुण्यातील बऱ्याच किल्यांना आपण अवघ्या एका दिवसामध्ये पूर्ण करु शकतो. तसे पुण्याजवळ बरेच किल्ले आहेत त्यामधील आपण काही प्रमुख किल्ल्यांची माहिती बघूया –

लोहगड किल्ला Lohagad Fort

पुण्यापासून “लोहगड किल्ला” जवळपास ६६ किलोमीटर लांब आहे.  किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी आपण पुण्याहून लोकल ट्रेनने मळवलीपर्यंत जाऊन तिथून ६ किलोमीटर खासगी वाहनाने जाऊ शकतो. पुण्याहून लोणावळा लोकल दर तासाला सुटते. स्वतःचे वाहन असेल तर आपण रस्त्याने जाताना मावळमध्ये भाजे गावाजवळ उंचीवर स्थित असलेल्या भाजे लेण्या बघू शकतो.

लोहगड चढण्यासाठी अगदी सोपा आहे, गडावर जाताना माकडं खूप असतात त्यामुळे माकडांपासून थोडं सावधान राहावं लागतं कारण माकडं आपल्या हातात असलेले खाण्याचे सामान ओढून घेतात. गडावर जाण्यासाठी ४ दरवाजे आहेत महादरवाजा, नारायण दरवाजा, हनुमान दरवाजा, गणेश दरवाजा. गडावर पाहण्यासारखी बरेच ठिकाणं आहेत जसे महादेव मंदिर, शिवकालीन तोफा, लक्ष्मी कोठी, विंचू कडा, दर्गा, गुहा, अष्टकोनी तलाव, सोळा कोणी तलाव आणि बरेच काही.

विसापूर किल्ला Visapur Fort

Visapur-Fort

विसापूर किल्ला पुण्यापासून ६५-६६ किलोमीटर अंतरावर आहे आणि लोणावळ्यापासून अगदी जवळ आहे. पुण्यावरून मुंबई -पंढरपूर रोडने जाण्यासाठी जवळपास २ तास वेळ लागतो(via Mumbai – Pandharpur Rd and Mumbai – Pandharpur Rd/Old Mumbai – Pune Hwy). जाताना आपल्याला तळेगाव – वडगाव – कान्हे – कामशेत – सावंतवाडी अशी अनेक गावे लागतात. रेल्वेने जायचं म्हटल्यास आपण पुण्याहून मळवलीपर्यंत लोकलने जाऊन तिथून रिक्षाने किंवा पायी चालत जाऊ शकतो. गडावर जाताना अगोदरच जेवण आणि पिण्यासाठी पाणी सोबत घेऊन जावे लागते.

किल्ल्यावर पाहण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत जश्या प्राचीनकालीन लेण्या, प्राचीनकालीन पाण्याचे कुंड, प्राचीन बनावटीच्या गुहा, मोठं-मोठ्या कमानी, भगवान हनुमानाची मंदिरे तसेच पावसाळ्यात किल्ल्याच्या पायऱ्यांवरून खळखरणारे पाणी हे द्रुष्य मनमोहक असते.

तिकोणा किल्ला Tikona Fort

तिकोणा किल्ल्याचा आकार हुबेहूब त्रिकोणासारखा आहे म्हणून या किल्ल्याला तिकोणा असे म्हणतात हा किल्ला पवना नदीच्या खोऱ्यात स्थित आहे. एक सोपा ट्रेकिंग करता येणारा हा किल्ला आहे. ह्या किल्यावर जवळपास सात जलाशय, सातव्या शतकातील लेणी, महादेव मंदिर आहेत तसेच आपल्याला गडावरून पवना धरण, विसापूर किल्ला, लोहगड पाहता येतात.

किल्ल्यावर जाण्यासाठी वेगवेगळ्या वाटा आहेत काशिंग, घेवन, आणि तिकोना पेठ  तिकोना येथे फक्त आठ दहा घरांची छोटी वस्ती किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेली आहे. तिकोना पेठेतून गडावर दोन रस्ते जातात पहिला रस्ता सरळ चढून असणारी जी पालथा दरवाजातून माचीवर जातो तर दुसरा लांबची जी गडाच्या दक्षिणेकडील डोंगराचा नाकाडी वरुन जी खिंडीच्या जवळून माचीवर पोहचतो.तिकोना किल्ला पुणे जिल्ह्यातील पवन मावळातील एक  किल्ला असून पुण्यापासून ५५-६० किलो मीटर अंतरावर आहे तसेच मुंबई पासून १२० किलो मीटर.

शिवनेरी किल्ला Shivneri Fort

Shivneri-Fort

शिवनेरी किल्ला हा बहुचर्चित किल्ला आहे कारण छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान म्हणून या किल्ल्याची ओळख आहे. शिवनेरी किल्ला हा पुण्यापासून उत्तरेला ९७-९८ किलोमीटर अंतरावर आहे. जुन्नर वरून आपल्याला किल्ल्यावर जाता येते. किल्ल्यावर पाहण्यासाठी भक्कम ठिकाणे आहेत जसे सात दरवाजे, प्रवेशद्वार, तानाजी मालुसरे उद्यान, शिवाई देवीचे मंदिर, बुद्धांचे लेणी, शिवाजी महाराजांचे जन्म घर, बदामी तलाव, कडेलोट टोक, गंगा जमुना टाकी, अंबरखाना, शिवकुंज. शिवनेरी छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असल्यामुळे मराठ्यांच्या इतिहासात या किल्ल्याला सर्वाधिक महत्त्व. शिवजन्मोत्सव असो किंवा कोणताही महत्वाचा दिवस असो या दिवशी गडावर शिवप्रेमींची अफाट गर्दी असते.

राजगड किल्ला Rajgad Fort

Rajgad-Fort

राजगड किल्ला पुणे शहरापासून दक्षिण-पश्चिमेस जवळपास ४८-५० किलोमीटर अंतरावर स्थित आहे. स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून या किल्ल्याची ओळख आहे. किल्ल्याच्या चारही बाजूने घनदाट जंगल आणि खडतर वाट ही या किल्ल्याची ओळख आहे. राजगडाकडे जाताना चारही बाजूंनी एखादी नदी किंवा कोणती न कोणती टेकडी ओलांडावीच लागते. सुरक्षिततेच्या दृष्टीने हा किल्ला चांगला होता, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगडाची आपले राजकीय केंद्र म्हणून निवड केली होती. गडावर जाण्यासाठी पाली दरवाजा हा सर्वात सोपा पायऱ्या पायर्यांचा रास्ता आहे. किल्ल्याचा विस्तार खूप मोठा असल्यामुळे संपूर्ण गड एका दिवसात पाहणे शक्य होत नाही. गडावर पाहण्यासारखी बरिच ठिकाणे आहेत जसे सुवेळा माची, पद्मावती माची, संजीवनी माची, पद्मावती तलाव, राजवाडा, गुंजवणे दरवाजा, पद्मावती मंदिर, काळेश्र्वरी बुरूज, बालेकिल्ला, आळू दरवाजा, इत्यादी.

सिंहगड किल्ला Sinhagad Fort

पुणे ते सिंहगड हे अंतर साधारणतः ३०- 3५ किलोमीटर आहे. आपल्याला दुचाकी किंवा चारचाकी गाडीने थेट गडापर्यंत जात येते. सिंहगडाला कोंढाणा असेही म्हटले जाते. गडावर नेहमीच पर्यटकांची वर्दळ सुरु असते. कोंढाणेश्वर मंदिर, उदेभांनचे स्मारक, तानाजी मालुसरेंचे स्मारक, दारूचे कोठार, टिळक बंगला, कल्याण दरवाजा, तानाजी कडा, राजाराम महाराजांचे स्मारक, देवटाके असे कित्येक ठिकाणं गडावर आहेत. गडावर खाण्यापिण्याच्या गोष्टी मिळतात जसे लिंबू शरबत, स्नॅक्स, पिठलं भाकरी आणि बराच काही. सिंहगडाकडे जाताना खडकवासला डॅम लागतो तिथे आपण फोटोग्राफी करू शकतो.

तुंग किल्ला Tung Fort

तुंग किल्ला पुण्यापासून ६५ किलोमीटर तसेच लोणावळ्यापासून २३-२४ किमी अंतरावर आहे. तुंग लिल्ल्याला काठिंगगड असेही म्हणतात  आणि काठिंगगडचा अर्थ मराठीत “कठीण किल्ला” असाहि होतो. किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेल्या तुंगवाडीतून पायी चालत गडावर जाता येते. तुंग किल्ला हा गिरिदुर्ग प्रकारात मोडतो तसेच पवना मावळात स्थित असून साधारणतः दोन -तीन तासात संपूर्ण किल्ल्याची ट्रेकिंग करता येते. किल्ल्यावर जमिनीत खोदलेल्या गुहा, बाले किल्ला, गणेश दरवाजा, हनुमान दरवाजा, गणेश मंदिर, तुंग देवीचे मंदिर, सदर, पाण्याच्या टाकी, वाड्याचे अवशेष असे काही प्रमुख ठिकाणे आपल्याला गडावर पाहता येतात.

राजमाची किल्ला Rajmachi Fort

Rajmachi-Fort

पुणे ते राजमाची अंतर हे जवळपास ८५ ते ९० किलोमीटर आहे किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी रेल्वे तसेच रोडने असे दोन पर्याय आहेत त्यासाठी पुण्याहून ३ तास वेळ लागतो. किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेल्या उधेवाडी या गावातून राजमाचीला जाता येते. राजमाची किल्ला गिरिदुर्ग प्रकारचा आहे. किल्ल्यातील वेगळी वास्तुकला हे त्याचे आकर्षण ठरते.  ईथल्या भव्य वास्तूमध्ये पाण्याचे साठे, गुप्त प्रवेशद्वार, विशालकाय भिंती, निवासी ठिकाणे, मंदिरे आहेत. तसेच भारतीय पद्धतीने बांधन्यात आलेले दोन मनरंजन किल्ला आणि श्रीवर्धन किल्ला असे दोन बालेकिल्ले आहेत. या दोन किल्ल्यांमधील घाटावर कालभैरव मंदिर आणि हेमदपंती-शैलीतील शिव मंदिर वसलेले आहेत. राजमाची किल्ल्यावरून आपल्याला सह्याद्री पर्वतरांगांचे हिरवळीने नटलेले अप्रतिम दृश्य दिसते.

पुरंदर किल्ला Purandar Fort

Purandar-Fort

पुण्याहून पुरंदर किल्ल्यावर जाण्यासाठी दोन रस्ते आहेत खेड शिवापूर मार्गे ५२ किलोमीटर अंतर आहे त्यासाठी जवळपास २ तास वेळ लागतो तर बोपदेव घाटमार्गे ४०-४१ किलोमीटर आहे त्यासाठी १.४५ तास वेळ लागतो. छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म आणि पुरंदरचा तह या ऐतिहासिक घटनेमुळे पुरंदरचा इतिहास दैदिप्यान राहिला आहे. सद्या पुरंदर किल्ला भारतीय सेनेच्या ताब्यात आहे, किल्ल्यावर सेनेच्या कमानीमधूनच प्रवेश करावा लागतो म्हाणून तिथे जाताना आपल्याकडे ओळखपत्र असणे आवश्यक आहे कारण बऱ्याच वेळेस गेटवर चेकिंग केली जाते. किल्ल्यावर जाण्यासाठी रॉड सद्यातरी उत्तम दर्जाचा आहे.  किल्ल्यावर बिनी दरवाजा, वीर मुरारबाजी देशपांडे, पद्मावती तळे, शेन्दर्‍या बुरूज, पुरंदरेश्वर मन्दिर, रामेश्वर मन्दिर, पेशव्यांचे वाड्यांचे अवशेष, दिल्ली दरवाजा, खन्दकडा, केदारेश्‍वर मंदिर, कोकण्या बुरूज, पुरंदर माची अशा खूप गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. हा किल्ला मिलिटरीच्या ताब्यात असल्यामुळे गड सुस्थितीत आहे. परंतु बऱ्याच जागेवर जाण्यासाठी निर्बंध आहेत.

तोरणा किल्ला Torna Fort

Torna-Fort

पुण्यापासून सुमारे ६० किमी दूर अंतरावर तोरणा किल्ला आहे. रायरेश्वरांच्या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांसह स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली होती त्यानंतर महाराजांनी प्रथम तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. महाराजांच्या सर्व किल्ल्यांमधून तोरणा किल्ला हा सर्वात उंच आहे. किल्ल्याचा आकार खूप विशालकाय आहे म्हणून छत्रपतींनी या किल्ल्यांचे नामकरण प्रचंडगड असे केले. पायथ्याच्या वेल्हे गावापासून बिनी दरवाजातून पाऊलवाटेने साधारण दोन तासात आपल्याला गडावर पोहोचता येते. गडावर तटबंदी, बुरुज, मेंगाई देवीचे मंदिर, तोरणजाई देवी मंदिर, झुंजार माची, तोरणेश्वर महादेव मंदिर, बुधला माची असे बरेच पाहण्यासारखे ठिकाणे आहेत

Show More

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button